Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय!
    महाराष्ट्र

    कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 26, 2026Updated:February 26, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अजित पवार यांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारी 2026 रोजी झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाची अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरूवातीला सांगितले की, अजित पवार गंभीर जखमी आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्या अपघातानंतर मोठा संशय व्यक्त केला जात आहे.

    आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. आज ते बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र, अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी काही आरोप केले. अजित दादांचा एफआयआर दाखल का होत नाही? जर आमचा एफआयआर बरोबर नसेल तर आमच्यावर कारवाई करा, असे आम्ही त्यांना म्हणालो. कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    रोहित पवार म्हणाले की,  2 तास आम्ही पोलिसांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. अपघात झाल्यावर Accident रिपोर्ट झालाय. मात्र, त्यातील क्रिमिनल अँगल तपासला जात नाही. त्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला करुन जात नाही. CID किंवा इतर कोणीही तपास करू द्या पण FIR दाखल करा.

    आम्ही त्यांना हे पुरावे दिल्यावर अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी 1 तासाचा वेळ मागितला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. एफआयआर दाखल होत नाही म्हणजे नक्कीच यामागे कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. VSR कंपनीच्या हलगर्जीपणा दिसत आहे.

    मुंबईप्रमाणे बारामती पोलिसांवरही दबाव असल्याचे आम्हाला दिसून आले. यामागे कोणीतरी आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले. इथे लोक आले आहेत आणि वकीलही आले आहेत. अजित पवार इतक्या मोठ्या लोकांचे मित्र होते तर त्या मित्रांनी लक्ष घालायला हवे असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. कबुतरे चोरीला गेल्याचा एफआयआर झाला पण अजित पवारांची एफआयआर होत नाही तर यामागे काय आहे?

    #crime aggressive stance ajit pawar Ajit Pawar accident Baramati Airport Baramati police station Rohit Pawar Suspicion
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.