शेत शिवारातील सौर ऊर्जा कृषी पंप वादळाने उखडला
शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी : गाळण खु" येथील घटना
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील गाळण खुर्द येथील शेतकऱ्यांने त्यांचे शेतात सौर ऊर्जा कृषी पंप संच लावला होता. परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने त्यांचे शेतातील सौरऊर्जा कृषी पंप उखडुन पडला. हवालदिल शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

पाचोरा तालुक्यातील गाळण खुर्द येथील प्रशांत सुदाम निकम या शेतकऱ्याची गाळण खुर्द शेत शिवारात गट क्रं. ११६, खाते क्रं. ७८६ ही शेत जमिन आहे. वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने प्रशांत निकम यांनी त्यांचे शेतात सौर ऊर्जा कृषी पंप बसविला होता.
दरम्यान १९ आॅक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या परिसरात जोरदार वादळासह पाऊस झाल्याने प्रशांत निकम यांचे शेतातील सौरऊर्जा कृषी पंप उखडुन पडला आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.