दुर्देवी.. दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू

नातेवाईकांनी केला आरोप

0

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.  दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .सोलापुरातील मोदी परिसरात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही घटना आहे .भाग्यश्री म्हेत्रे (वय 16), जिया महादेव म्हेत्रे (वय 16) ही मृत मुलींची नावे आहेत तर जयश्री महादेव म्हेत्रे (वय 18) या मुलीची  तब्येत गंभीर आहे .

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली . यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे .मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे . भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे .दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे .

नेमकं काय घडलं ? 

गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील बाबू जगजीवन झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होतोय . आता दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय .एका मुलीची प्रकृती गंभीर आहे .दूषित पाण्यामुळेच मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत. मोदी परिसरातील जगजीवन राम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिली . यानंतर स्थानिकांनी दूषित पाण्यावरून मोठा रोष व्यक्त करत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला .

 

Leave A Reply

Your email address will not be published.