Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»अमळनेरमध्ये 19 मार्चपासून भूमी सुपोषण व संरक्षण अभियान
    कृषी

    अमळनेरमध्ये 19 मार्चपासून भूमी सुपोषण व संरक्षण अभियान

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 19, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    “भूमी स्वस्थ राहिली तर समाज स्वस्थ राहील” या भावनेतून तंत्रज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर मेळ साधत शेती – मातीसोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अक्षय कृषी परिवाराच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘भूमी सुपोषण एवं संरक्षण अभियानाचा’ शुभारंभ 19 मार्च रोजी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात देशाचे कृषी मंत्री तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे.

    या अभियानाच्या निमित्ताने शेती, माती आणि जीवन यावर परिवर्तनात्मक संवाद होणार असून हे अभियान एक व्यापक चळवळ बनावे, यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम विभाग क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर तसेच मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले उपस्थित होते.

    यावेळी बाळासाहेब चौधरी यांनी प्रस्ताविकातून अक्षय कृषी परिवारामार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. गजानन डांगे यांचा परिचय करून देण्यात आला. डॉ. डांगे यांनी सांगितले की, रासायनिक शेतीचा मानवी आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. सर्व साधने उपलब्ध असतानाही आपण एका विशिष्ट व्यवस्थेत अडकून पडलो आहोत. हा बदल दूरगामी असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. “जमीन सुपोषित ठेवायची असेल तर बियाण्यांपासून शेती पद्धतीपर्यंत नव्याने विचार करण्याची गरज आहे. भारताच्या भूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे, ” असे त्यांनी स्पष्ट केले.

    देशभरातून ५ हजार कृषीप्रेमी सहभागी होणार

    हे अभियान दरवर्षी देशभरात एक महिना राबविले जाते. यंदा 19 मार्चपासून अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात हे अभियान सुरू होणार असून देशभरातून सुमारे 5 हजार कृषीप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाची भक्कम साथ आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांनी गावागावातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या अभियानासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, सहकार्य आणि नियोजन करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत संपूर्ण सहकार्याची ग्वाही देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.