Sunday, November 27, 2022

सर्वसामान्यांना दिलासा ! सणासुदीला साबणाच्या किंमती घसरल्या

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाई (inflation) वाढत असल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. त्यातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. साबण कंपन्यांकडून साबणाच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. FMCG कंपन्यांनी साबणाचे दर कमी केल्यामुळे आता सणासुदीला ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

रोजच्या वापरातील वस्तू तयार करणाऱ्या FMCG कंपनीने साबणाऱ्या किंमती 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या उत्पादनाच्या किंमती घसरल्याने हा निर्णय घेतल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड (Hindustan Uniliver Limited), गोदरेज (Godrej) यांनी साबणाऱ्या किंमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे.

लाइफबॉय (Lifebuoy) आणि लक्स ब्रँडने (Lux Soap) साबणाच्या किंमतीमध्ये 5 ते 11 टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. गोदरेजने 13 ते 15 टक्के किंमती कमी केल्या आहेत. गोदरेज नंबर वन साबणाच्या पाच पाकिटांची किंमत १४० रुपये होती. हा साबण आता १२० रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या