शरद पवार म्हणतात पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं?

यांना फुकट देण्याच्या सवयी लावायच्या आहेत : राज ठाकरेंचा शरद पवारांसह लाडकी बहिण योजनेवर घणाघात

0

 

मुंबई

मनसेच्या मेळाव्यातून आज रविवारी राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरेल.  यावेळी त्यांनी शरद पवार यांना इतिहासाची आठवण करुन दिली. राज ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात पक्ष फोडला. मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? १९७८ ला काँग्रेस फोडली. १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर राणेंचं झालं. त्यांना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता. मी अजित पवारांबद्दल बोलत होतो. आता ते गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहीत नाही. भाजप त्यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपमध्ये येण्या आधी मोदी म्हणतात ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू. त्याऐवजी मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय. कारण तुम्हाला गृहित धरलंय. सर्वांना गृहित धरलंय, असे राज्यातील जनतेने राज ठाकरे यांनी सांगितले.

 

“आज लिहून देतो. लाडकी बहिण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतं तुम्हाला फुकट. महिलांच्या हातांना काम द्या. कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा. एवढ्या सक्षम महिला आहेतच. त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देताय. बेरोजगारांना फुकट पैसे. शेतकऱ्यांना फुकट वीज. शेतकरी कुठे मागतो फुकट वीज. तो म्हणतो वीजेत सातत्य द्या. कमी पैश्यात द्या. पण वीज तर द्या. राज्यात कोणी काही मागत नाही. यांना फुकट देण्याच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा सवयी लागल्या तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. नागडा होणार महाराष्ट्र. राज्य म्हणून काही विचार करणार की नाही.”

 

हे जनतेचे नाही राहिले तुमचे काय होणार

आमचे आमदार फुटतात, खासदार फुटतात, कुणावर विश्वास बसत नाही. विश्वास बसवत नाही. आता आहे हा इथे जाईल की तिथे जाईल. अशी परिस्थिती राज्यात कधीच नव्हती. आम्ही यादी पाहत होतो. प्रत्येकवेळेला विचारावं लागत होतं, हा आता कुठे आहे. काही निष्ठाबिष्ठा नावाची गोष्ट आहे की नाही. राज्यातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाही, तुमचे काय राहणार आहेत. ही अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.