आतापर्यंत हजारो महिलांनी पैसे केले परत…

निकषात न बसणाऱ्या अर्जाबाबत सरकारचा निर्णय

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा होत आहे. ज्या महिला अपात्र आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या योजनेत कोणत्याही महिलांकडून जबरदस्तीने परत घेतले जाणार नसल्याने महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून परत घेण्यात येत आहे, अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीत धरुन नाहीत, असं महिला व बालविकास विभाग सचिव अनुपकुमार यादव यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्याचसोबत स्वेच्छेने लाभार्थी रक्कम परत केली आहे. आतापर्यंत हजारो महिलांनी पैसे परत केले आहेत. तसेच ज्या महिलांना पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत अनेक महिला स्वतः सांगत आहेत. अशा महिलांना लाभ देण्यात येणार नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत घेण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. यामध्ये अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. अपात्र महिलांकडून सर्व महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांकडून पैसे परत घेणार नसल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.