मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील कु. स्नेहल राजू चव्हाण (प्रथम वर्ष विज्ञान) या खेळाडूचा महाविद्यालयातर्फे आंतरविद्यापीठ फ्लोअरबाँल स्पर्धेत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी सत्कार केला.
याप्रसंगी क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके व प्रा. संजीव साळवे (विद्यार्थी विकास अधिकारी) उपस्थित होते. या आंतरविद्यापीठ फ्लोअर बॉल स्पर्धा नुकत्याच आय. टी. एम विद्यापीठ ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे संपन्न झाल्या. कु. स्नेहल हिला क्रीडा संचालिका प्रा. डॉ. प्रतिभा ढाके, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, दिपक वाढे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, व्यवस्थापन मंडळ, उपप्राचार्य डॉ. ए.पी.पाटील, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.