सर्पदंश झालेल्या त्या मुलीचे अखेर निधन

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथील युवतीस सर्पदंश झाला होता. त्यावर पारोळा येथील कुटीर रूणालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दि.२४ रोजी मुलीचे अखेर निधन झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथील सुवर्णा पोपट पवार या युवतीला दि.१८ अक्टोबर रोजी सर्पदंश झाला. यानंतर उंदिरखेडा येथील ग्रामस्थांनी तीला पारोळा कुटिर रुग्णालयात दाखल केले होते. परंतु इथे सर्पदंश वरील लस उपलब्ध न असल्याने तीला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना दि २४ अक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत उंदिरखेडा येथील ग्रामस्थांनी कुटीर रूणालयाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत गुरुवारी कुटीर रूणालया समोर उपोषण सुरू केले. त्यानंतर माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मध्यस्थी करत हे उपोषण सोडवले.

यावेळी ग्रामस्थांनी कुटीर रूणालया बाबत अनेक तक्रारी केल्या पारोळा येथील कुटीर रूणालय हे असुन न असल्या सारखे आहे. कोणता ही किरकोळ रूग्ण जरी आला त्यावर प्रथमोपचार करून लगेच त्याला धुळे, जळगाव येथे पाठविण्यात येते. म्हणून ग्रामस्थांनी कुटीर रूणालयाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री डॉ. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधला व रुग्णालयात पुरेशी औषधे नाहीत, हा मुद्दा उपस्थित केला. तसेच योग्य त्या सेवा नसल्याची ही तक्रार त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली. जिल्हा शल्यचिकित्सकानी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, रोहन पाटील, मनोराज पाटील, गौतम पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चव्हाण यांच्यासह उंदिरखेडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.