सर्पदंशाने  ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

0

सर्पदंशाने  ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा येथील घटना 

पाचोरा (प्रतिनिधी) :शहरातील कृष्णापुरी गावात शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने ४१ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

जयवंत मधुकर बोरसे (वय ४१, रा. कृष्णापुरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत मधुकर बोरसे हे शेतात काम करत असताना अचानक त्यांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पाचोरा येथील वारस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सर्पदंशामुळेच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेतकरी कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कृष्णापुरी परिसरात  पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.