सर्पदंशाने १५ वर्षीय युवकाचा मृत्यू

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील ओझर येथे एका १५ वर्षीय युवकास विषारी सर्पाने चावा घेतल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ओझर ता. पाचोरा येथे गणेश भाईदास बारेला (वय १५) हा युवक घरात झोपलेला असताना अचानक एका विषारी सर्पाने त्यास चावा घेतला. गणेश बारेला यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.