अरे बापरे ! तरुणाचा 3 कोब्रांसोबत जीवघेणा खेळ; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

साप पाहिल्यावर अनेकांची भांबेरी उडते. मात्र काहीजण सापासोबत अगदी बिनधास्तपणे खेळतात. अनेकदा साप पकडणाऱ्या व्यक्तींना सर्पदंश झालेला दिसतो. म्हणून सापाशी खेळ करणे अनेकदा जीवावर बेतू शकते. असाच एक भयानक अंगावर काटा आणणारा सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क एक नाहीतर तीन सापांशी जीवघेणा स्टंट करत आहे. हे साप काही साधेसुधे नाहीतर विषारी किंग कोब्रा आहेत. तिन्ही कोब्रा तरुणासमोर फणा काढून बसले असतांना हे तरुण सापांसमोर बिनधास्तपणे बसून सापांसोबत खेळत आहे.

या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे हा तरुण व्यक्ती सापांना वारंवार हात लावून त्यांना डिचवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सापही या तरुणाच्या हालचालींकडे पाहून डोलत आहेत. यावेळी अचानक एक साप त्या व्यक्तीवर हल्ला करते. त्या व्यक्तीवर झेप घेत त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. हा तरुण अगदी बेसावधपणे बसला असला तरी तो साप पकडण्यात तरबेज दिसते आहे. कारण सापाने हल्ला केला तरी ती घाबरत नाही. जसा साप हल्ला करतो तसा हा तरुण त्याची शेपटी धरते. सुदैवाने साप त्या व्यक्तीच्या पँटला आपल्या तोंडात धरतो.

हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटर पोस्ट केलाय. यावेळी त्यांनी माहिती दिली की, कोब्राला नियंत्रणात आणण्यासाठी ही पद्धत अत्यंत भयंकर आहे. या कोणत्याही हालचालींना साप धोका मानतो, त्यामुळे त्या हालचालीप्रमाणे तो स्वतःही हालचाल करतो. पण ही क्रिया अनेकदा घातक ठरू शकते. म्हणून सापांशी असा जीवघेणा खेळ अंगाशी बेतू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.