सर्पदंश प्रथमोपचार आणि उपचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपला देश हा निसर्गसंपन्न असा देश आहे . अर्थात अनेक प्रकारच्या वन्यजीवांची ,पशुपक्षांची आणि सरीसृप वर्गातील प्राण्यांची तितकीच विविधता असलेला असा आपला देश आहे . याच समृद्धतेतील सरीसृप वर्गातील प्राणी साप ,किंवा नाग ,घोणस ,फुरसे या प्राण्यांची फक्त नाव घेतली तरी अंगावर शहारे उमटतात . कारण अर्थातच या सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांविषयी जनमानसात असलेली प्रचंड भीती . पावसाळ्याच्या सुमारास विशेषतः ग्रामीण भागात याच सरपटणाऱ्या सापांचा ,नागांचा मुक्त संचार सुरु असतो .

त्यामुळेच आपल्या जिवाच्या रक्षणासाठी लोकवस्तीत आसरा घेण्यासाठी येणाऱ्या याच सापांचा अपघाताने मानवाला दंश होतो आणि मृत्यूशी झुंज द्यावी लागते . मुळात सर्पदंश आणि औषधोपचार याविषयी जनमानसात प्रचंड समाज गैरसमज प्रचलित आहेत . त्यातच मनात प्रचंड भीती असल्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर तातडीने उपचार सुरु करण्याऐवजी अनेक लोक घरगुती किंवा मांत्रिक उपचारांचा आधार घेतात आणि रुग्ण दगावतो .

म्हणूनच सर्पदंश झालेल्या रुग्णाला अगदी प्राथमिक उपचार कोणते द्यावेत ?साप चावल्यानंतर तो विषारी किंवा बिनविषारी आहे हे कसे ओळखायचे ?साप चावल्यानंतरची लक्षण कोणती ?आणि त्यावर नेमकी उपचार पद्धती काय आहे ? याच प्रश्नांचा वेध घेण्यासाठी सुप्रसिद्ध सर्पदंश विकार तज्ज्ञ डॉकटर सदानंद राऊत यांच्याशी साधलेला संवाद .

सर्पदंश या विषयाचा वेध घेताना सर्पदंशामुळे जागतिक स्तरावर आणि आपल्या देशात दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे ?

संपूर्ण जगाचा विचार केला तर दरवर्षी जगभरात साडेपाच ते सहा लाख लोकांना सर्पदंश होतो . त्यापैकी उपचारांअभावी १ लाख लोक मृत्युमुखी पडतात तर उर्वरित चार लाख लोकांना कायममचे अपंगत्व येते किंवा ते रुग्ण मानसिक आजारी बनतात . आपल्या भारतात दरवर्षी अडीच ते ३ लाख लोकांना दरवर्षी सर्पदंश होतो त्यापैकी ४० ते ५० लाख लोकांचा मृत्यू ओढवतो . आणि उर्वरित लोक कायमचे अपंग बनतात किंवा मानसिक आजाराने ग्रासतात . मागील वर्षी आपल्या महाराष्ट्रातच ३३ हजार लोकांना सर्पदंश झाला होता . विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जितके मृत्यू हे सर्पदंशाने होतात त्या आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक मृत्यू हे झालेले असतात ज्याची नोंद होत नाही . आपल्या देशात दरवर्षी साधारण १ लाख लोक एड्स सारख्या भयन्कर आजाराने मरतात तर यापैकी निम्मे म्हणजे ५० हजार लोक हे केवळ सर्पदंशाने मरतात इतके प्रमाण मोठे आहे .

आपल्याकडे सापांच्या विविध जाती आहेत परंतु त्यापैकी विषारी साप आणि बिनविषारी साप किती आहेत ?

सापांच्या जाती आहेत त्यापैकी आपल्या देशात २७२ जातीचे साप आढळतात . या २७२ जातींच्या सापांमध्ये केवळ ५२ जाती या विषारी सापाच्या आहेत . आपल्या देशात प्रामुख्याने ४ विषारी जातीचे साप आढळतात . नाग आणि मण्यार हे साप चावले कि ते मनुष्याच्या मज्जा संस्थेवर दुष्परिणाम करतात . आणि घोणस किंवा फुरसे या जातीचे विषारी साप चावले कि ते रक्ताभिसरण प्रक्रियेवर दुष्परिणाम करून रक्त अक्षरशः गोठवतात . शिवाय पश्चिम महाराष्ट्रात बांबूपित व्हायपर नावाचे साप देखील आढळतात जे बिनविषारी आहेत .

सर्वसामान्य लोकांना विषारी साप आणि बिनविषारी साप याची ओळख नसते हे ओळखायचे कसे ?

आपल्याकडे नाग किंवा नाजा जातीचे जे साप असतात त्यांच्या फण्यावर १० चा आकडा असतो . फुरशे जे असते त्याच्या त्वचेवर रंगीत खवले किंवा तपकिरी रंगाचे ठिपके असतात . तर मण्यार च्या शरीरावर काळ्या निळ्या रंगाचे ठिपके असतात . धामण जी असते तिच्या शरीरावर देखील असेच ठिपके असल्याने नाग आणि धामण यामधला फरक लक्षात येत नाही . परंतु नागाने फणा उगारल्यानंतरच खून पटते . बिनविषारी सापांची विशेष ओळख म्हणजे त्यांची बुब्बुळ हि लंब वर्तुळाकार असतात तर विषारी सापांची बुबुळ हि गोलाकार असतात .

विषारी साप चावल्यानंतरची लक्षण नेमकी कोणती असतात ?

नाग किंवा मण्यार सारखा अत्यंत जहरी साप चावला तर माणसाचा अगदी २ तासात मृत्यू होतो . मज्जासंस्थेत विष झपाट्याने पसरल्याने मनुष्याला चक्कर येते ,बोलणं तोतर होत ,थुंकी गिळण्यास खूप त्रास होतो ,दम लागतो ,रक्तातील ऑक्सिजन कमी होत जातो आणि मनुष्य मृत्युमुखी पडू शकतो .तर मण्यार चावला तर लक्षण थोडी उशिरा जाणवतात . मण्यारचे दात छोटे असल्यामुळे चावल्यानंतर जाणवत नाही . वेदना किंवा सूज देखील येत नाही . आणि लक्षण ३ ते ४ तासानंतर जाणवायला सुरवात होते . माणसाचे सांधे दुखतात ,शरीर लकवा मारल्याप्रमाणे स्तब्ध होते आणि कालांतराने मनुष्य बेशुद्ध होतो .घोणस किंवा फुरसे हे हिमोटॉक्सिस सर्प आहेत . हे सर्प चावले कि तीव्र सूज येते वेदना होतात .अंगावर बारीक फोड देखील येतात . रक्त गोठण्याची प्रक्रिया थंडावते आणि माणसाला हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो . तर घोणस चावला कि माणसाच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो पोट खूप दुखत ,मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो अनेकदा माणसाची लघवी देखील बंद होते आणि दोन्ही किडनी निकामी होतात अशा रुग्णाला हिमोडायलिसिस ची गरज भासते . फुरसे चावले कि त्याचे दात खोल जातात . रक्तात गुठळ्या होतात आणि माणसाला पक्षाघाताचा झटका येतो .
५] कोणत्याही सापाने दंश केल्यानंतर मनुष्य संभ्रमावस्थेत असतो . नेमके काय उपचार करायचे याबाबत तो गोंधळलेला असतो मात्र सापाचे विष संपूर्ण शरीरात पसरू नये यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असतो .

अशावेळी प्रथमोपचार नेमके काय करायचे ?

सर्प चावल्यानंतर सापाचे विष संपूर्ण शरीरात पसरू नये हि भीती असते त्यामुळेच रुग्णाला अगोदर मोकळ्या हवेत झोपू दयावे . सर्पदंश झालेल्या रुग्णाला सातत्याने धीर द्यायला हवा . अशा रुग्णाला हालचाल करू देऊ नये किंवा श्रम करायला लावू नये . कारण हालचाल केल्याने किंवा धावपळ केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया जलद होऊन मेंदूपर्यंत विष पसरण्याची भीती असते . सर्पदंश झालेल्या जागेवर दोरीने घट्ट बांधणे ,ब्लेडने कापणे ,किंवा तंत्र मंत्र असे अघोरी आणि खोटे उपचार अजिबात करू नयेत .साप चावल्यानांतर वेळ न दवडता रुग्णाला ताबडतोप हॉस्पिटल मध्ये हलवावे आणि उपलब्ध लस द्यावी

सर्पदंश झालेल्या रुग्णाच्या हॉस्पिटल यामध्ये कोणत्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात ?
सर्पदंश झालेल्या रुग्णाचे हॉस्पिटल यामध्ये आणताच नाडीचे ठोके तपासले जातात . रक्तदाब मोजला जातो . त्यानंतर ऑक्सिजन चे प्रमाण सातत्याने तपासले जाते . आवश्यकता असेल तर कार्डिओग्रॅम देखील काढला जातो . रुग्णाचे रक्त घेऊन ते २० मिनिट असेच ठेवतो ते रक्त जर गोठले नाही तर त्याला घोणस किंवा फुसरे लावलेले आहे हे कळते . त्यानंतर रक्ताची तपासणी करण्याची गरज असते . एकदा रक्ताच्या प्राथमिक तपासण्या झाल्या कि ताबडतोप रुग्णावर उपचारसुरु केले जातात .

सर्पदंश झालेल्या रुग्णाला रुग्णालयात आणल्यानंतर रक्ताच्या तपासण्या झाल्यानंतर उपचार नेमके काय केले जातात ?
रुग्णदंश झालेल्या रुग्णाला जर वेळेवर रुग्णालयात दाखल केले गेले नाही तर ताबडतोप मृत्यू होऊ शकतो त्यामुळेच सर्पदंश झालेल्या रुग्णाची स्थिती हि गंभीर असते आणि त्याच्यावर उपचार करणे हे देखील तितकेच जिकरीचे आणि आव्हानात्मक असते . रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच त्याच्यावर एकाच वेळी उपचाराला सुरवात करताना त्याचा रक्त दाब नियंत्रित ठेवण्य्साठी प्रयत्न केले जातात शिवाय ऑक्सिजन ची लेव्हल कमी होऊ नये म्हणूनत्याला कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो . त्याला सलाईन देखील लावले जाते आणि टायचा रक्तपुरवठा सुरळीत कसा होईल हे पहिले जाते . रुग्णाची हृदय प्रक्रिया बंद पडू नये म्हणू ताबडतोप सीपीआर चाचणी करावी लागते . आणि प्रसंगी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवायला लागते . सर्पदंशावर लस देखील उपलब्ध आहे ती काही तासांच्या आत रुग्णाला द्यावी लागते . अनेकदा या लसीचे प्रमाण चुकले तर त्याचे दुष्परिणाम देखील होऊ नयेत हे पाहिले जाते .

सर्पदंश झालेल्या मनुष्यावर उपचार केल्यानंतर त्याच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम जाणवत्तात ते कोणते ?
घोणस जातीचा सर्प चावला की त्याचे विष हे माणसाच्या किडनीवर परिणाम करते . किडनी निकामी झाल्यामुळे अशा रुग्णाला ५ ते १० वेळा डायलेलसीस केले कि रक्त शुद्ध होते . काही रुग्णांना मात्र आयुष्यभर डायलेसिस करावे लागते . काही रुग्णाच्या बोटाला दंश झाल्याने हि बोट कडून टाकावी लागतात . दंश झालेल्या जागेवर काळसर चट्टे पडतात आणि ती जागा कालांतराने सडते देखील . म्हणून तो भाग काढून टाकावा लागतो . घोणस चावल्याने शरीरातील हार्मोनस कमी होतात आणि लैंगिक शक्ती देखील कमी होते . संधिवाताचा त्रास देखील अनेक रुग्णांना जाणवतो .
९]सर्पदंशावर लस उपलब्ध आहे परंतु सर्वसामान्य लोकांना या लसीबद्दल माहितीच नसते हि लस नेमकी कशी बनते ?आणि सर्पदंशावर हि लस उपयुक्त आहे का ?

सर्पदंशावरील लस तयार करण्यासाठी विषारी सापांचे विष काढून घेतले जाते आणि ते घोड्यांच्या किंवा खेचरांच्या शरीरात सोडले जाते . या घोड्यांची चार महिन्यात प्रतिकारशक्ती वाढते . मग हे घोड्यांच्या किंवा खेचरांच्या शरीरातील रक्त पुन्हा काढले जाते आणि ज्या तयार झालेल्या अँटीबॉडीज लिक्विड किंवा पावडर च्या स्वरूपात जमा करून लस म्हणून रुग्णाला दिली जाते . या लसीची भीती एक म्हणजे या अँटीबॉडीज मध्ये घोड्याच्या शरीरातील प्रोटेनिक्स चे प्रमाण असल्याने त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात
१०] सर्पदंशावर उपलब्ध असलेल्या या लसीचे प्रमाण नेमके किती असावे आणि ती केंव्हा द्यावी ?
नाग किंवा मण्यार जातीचा विषारी सर्प चावला असेल तर या सापाचे विष भरभर शरीरात पसरते . त्यामुळेच लक्षण जाणवायला लागताच लगेच लस अशा रुग्णाला द्यावी . घोणस किंवा फुरसे चावल्यानंतर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावली तरच लस द्यावी . हि लस डॉकटर रुग्णाच्या योग्य त्या रक्त चाचण्या केल्यानंतरच देतात . अन्यथा टायचे शरीराला दुष्परिणाम देखील होऊ शकतात .

Leave A Reply

Your email address will not be published.