वाळूची चोरटी वाहतूक; तीन वाहने जप्त, सहा जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरात मोठ्याप्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. मध्यरात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे तीन वाहने जिल्हापेठ पोलिसांनी मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी जप्त केली आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील एन.एन. वाईन शॉपसमोरून वाळूने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच ०४ एएल ८७६८) यात बेकायदेशीर वाळू भरून वाहतूक करत असतांना पोलीसांनी पकडले.

याप्रकरणी पो.कॉ. अमित कुमार मराठे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक स्वप्नील पुंडलीक नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव आणि मालक ज्ञानेश्वर दिनकर बाविस्कर रा. पुनगाव ता. चोपडा या दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.