Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»घरांना बाहेरून कडी लावून बसवले स्मार्ट मीटर
    महाराष्ट्र

    घरांना बाहेरून कडी लावून बसवले स्मार्ट मीटर

    महावितरणच्या गजब कारभाराने नागरिकांमध्ये संताप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 15, 2026No Comments449 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    स्मार्ट मीटर लावण्यावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यात अजब प्रकार घडला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठाण्याच्या सावरकरनगरमध्ये दुपारी रहिवाशी झोपले असताना घराची बाहेरून कडी लावून लपून स्मार्ट मीटर लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर स्मार्ट मिटर लावण्यासाठी घोडबंदरवरील एका संकुलातील सहा इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर केवळ व्यापारी संकुल, आस्थापना यांना लावला जाईल सामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले जाणार नाही असे विधिमंडळाच्या अधिवेशनात आश्वासन देऊन विरोधकांना धारेवर धरले होते. तेच मुख्यमंत्री फडणवीस आता स्मार्ट मीटर अनिवार्य आहे असे सांगू लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

    स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने अदानी कंपनीचे हे खासगी मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी नवीन परिपत्रक काढून दबाव टाकत आहे. ज्या गृहनिर्माण संकुलात स्मार्ट मीटर लावले जात नाही त्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचा अन्यायकारक प्रकार करीत आहे. घोडबंदर रोडवरील विहंग गृहसंकुलातील तब्बल ६ इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार महावितरण कंपनीने केला आणि स्मार्ट मीटर लावण्यासाठी जुलूम करण्यास सुरुवात केली आहे. जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम राबविली जात असून त्यासाठी लोकांच्या घरांना कडी लावून मिटर बदलले जात आहे.

    स्वा.सावरकर नगरमधील डेनिस कंपाऊंडमध्ये आज (डेनिस चाळीत) रहिवाशी दुपारच्या वेळेस झोपेत असताना चक्क दरवाजा बंद असताना त्या दरवाजाला बाहेरून कडी लावून जुने मिटर काढून – नवीन स्मार्ट मिटर लावल्याचा प्रकार घडला. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला आहे. परिसरात २४ तास लाईट जाते त्यावेळी अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता, मेंटेनन्स नाही अशी कारणे सांगितली जातात. आता दुपारच्यावेळी राहिवाशांच्या दरवाजाला कड्या लावून जुने मिटर पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मार्ट मिटर लावून पळून जाणे आणि नंतर जुने मिटर ब्रेक करून टाकत असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif