लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरातील प्रसिद्ध संत सियाराम बाबा (वय ११०) यांचे मध्य प्रदेशातील खरगोन येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. बाबांच्या जाण्याचे वृत्त समजताच निमारसह देशभरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली होती. हजारो भाविक बाबांच्या आश्रमात अंत्यदर्शनासाठी दाखल होत आहेत. सियाराम बाबांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. बाबांच्या दर्शनासाठी दिल्ली, मुंबईसह देशभरातून भाविक आश्रमात दाखल होतात.
जिल्हा मुख्यालयापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कसरावद तालुक्यातील तेली भट्टीयन आश्रमात निमारमधील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय ख्यातीचे ११० वर्षीय सियाराम बाबा यांचे पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. सोशल मीडियावर बाबांच्या निधनाचे वृत्त समजताच लाखो भाविकांमध्ये शोककळा पसरली होती. सकाळपासूनच हजारो भाविक बाबांच्या दर्शनासाठी भट्ट्यान आश्रमाकडे रवाना झाले.
बाबा गेल्या दहा दिवसांपासून आजारी होते. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाचे पथक बाबांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. इंदूर, एमवायएच आणि खरगोन येथील डॉक्टरांची टीम आश्रमातच बाबांच्या उपचारात गुंतली होती. बाबांवर न्यूमोनियावर उपचार सुरू होते. मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सिसोदिया यांनी बाबांच्या मृत्यूला दुजोरा दिला.