ऐन दिवाळीत राज्यावर ‘सीतरंग’ चक्रीवादळाचे सावट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ऐन दिवाळीत (Diwali) पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाखा महाराष्ट्राला (Maharashtra) बसणार असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हे वादळ  ‘सीतरंग’ या नावानं (Sitrang Cyclone) ओळखलं जाणार आहे. 20 ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पण त्या वादळाचं मार्गक्रमण कसं राहिलं अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र, येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीत देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आाहन देखील हवामान विभागानं केलं आहे. सध्या एकीकडं राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. उत्री पिकं पाण्यात असल्यानं हाती काहीच उत्तन्न येण्याची शक्यता नाही. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच पुन्हा हवामान विभागान 23 आणि 24 ऑक्टोबरला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.