Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गर्भपाताच्या गोळ्या दिलेल्या डॉक्टरची एसआयटी चौकशी
    गुन्हे वार्ता

    गर्भपाताच्या गोळ्या दिलेल्या डॉक्टरची एसआयटी चौकशी

    खरात प्रकरणात नवी अपडेट : शेतकऱ्यांचीही फसवणूक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 2, 2026No Comments418 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महिलांना फसवून, जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट भोंदू बाबा अशोकर खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी फक्त नाशिकचं नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरलाय. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भोंदू खरात प्रकरणात एसआयटीकडून तपास सुरू असून खरातशी संबंधित अनेक लोकांची चौकशीही करण्यात येत आहे. खरात हा त्याच्या कार्यालयात येणाऱ्या महिलांना पेढा तसेच आणि कडवट-खारट चव असलेले पेय द्यायचा, ज्यानंतर त्या महिलांना अस्वस्थ वाटू लागे आणि तो त्यांच्यावर अत्याचार करायचा, लैंगिक शोषण करायचा अशी माहिती समोर आली होती. याच प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे.

    याप्रकरणी खरातच्या ओळखीच्या 3-4 डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच नाशिक मधल्या बड्या डॉक्टरची चौकशी झाल्याचेही उघड झालं आहे. खरातने याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणारी औषधं, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्या होत्या. एवढंच नव्हे तर महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची देखील एसआयटी कडून चौकशी करण्यात आली.

    भोंदू अशोक खरातने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता, त्यानंतर ती महिला गर्भवती राहिली. भोंदू खरातने त्या महिलेला त्याच्या नाशिक येथील ओकस कार्यालयामध्ये गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या, त्याला ज्या डॉक्टरने गोळ्या पुरवल्या, त्याचीच एसआयटीने कसून चौकशी केली आहे. भोंदू अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर काही महत्त्वाचे पुरावे एसआयटी अधिकाऱ्यांकडून न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत, असंही समजतं.

    अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा समोर आला असून नाशिक जिल्हयात बनावट फार्मर प्रोड्यूसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत शेतमाल खरेदी केला जातो. खरातने अधिका-यांसोबत असलेल्या संबधातून स्थापन बनावट कंपन्या केल्या. व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा खरात आणि त्याची पत्नी संचालक होती. तसेच आणखी 15 ते 16 कंपन्यात खरातची भागीदारी होती. कांदा, मका खरेदी करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांनी पोलीसात तक्रार केली आहे. खरातसह सहभागी अधिकाऱ्यांची इडी चौकशी करत कारवाईची मागणी त्यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.