लोकशाही न्यूज नेटवर्क
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली. आता महायुती सरकार निवडून आल्यानंतर, लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० हून २१०० रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान डिसेंबरचा हफ्ता केव्हा येणार,याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महायुती सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिवाळी आणि निवडणुका पाहता सरकारने २ हफ्ते दिवाळी आधीच दिले होते. आता पुढचा हफ्ता संक्रांतीआधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. डिसेंबर – जानेवारीचा हफ्ता, संक्रांतीआधी मिळणार आहे. संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

