Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचे हात : बड्या नेत्याचा मोठा दावा
    राजकारण

    शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचे हात : बड्या नेत्याचा मोठा दावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिवसेनेते उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला. शिवसेनेत उभी फूट हा आजही रवंथ केली जाते आहे. या फुटीमागील सल अद्यापही काही शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. अश्यात शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार भरत गोगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. यावेळी त्यांनी आतापर्यंत कधीही न पुढे आलेला एक दावा केला आहे. या फुटीमागे वहिनींचे हात असल्याचा बॉम्बगोळा गोगावले यांनी टाकला.

    आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. आमदार कार्यकर्त्यासह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत. त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो, असा तक्रारीचा सूर उमटत होता. पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबाप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते असे ते म्हणाले.

    बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेंव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही.

    महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एंट्री नाही. आता ज्या एंट्री आहेत ती रहायला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असे अनुभव सांगत गोगावले यांनी मन मोकळे केले.

     

    शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहोत

    आम्ही आत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत. त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षच चिन्ह आम्हाला मिळाला आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स पण गमावला, असा टोला गोगावले यांनी लगावला.

     

    ही अधोगतीला पोहचण्याची लक्षण : पेडणेकर

    भरत गोगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. टू द पॉईंटला आता यांना साक्षात्कार होत असतील तर मला वाटतं आता यांचा पॉइंटच चुकला आहे. जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे अधोगतीला पोहचण्याची लक्षण त्यांची दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

    ज्या पद्धत्तीने पती- पत्नी, माँ माँ ज्या पद्धत्तीने घरात वागत होत्या, टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत. रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा, संस्कार आहेत तेच रश्मी वहिनी करत आहेत. जेव्हा साहेब ओरडले तर हीच लोक वहिनींना मध्यस्थी करायचे. आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉईंट म्हणून जर काढत असतील, तर याला म्हणतात बुद्धीची कीव करावी, बुध्दीची अधोगती बघावी, असा घणाघात त्यांनी घातला.

     

    बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न

    आदित्यने मंत्री होऊ नये असे का वाटते. वयाच्या 14 व्या वर्षांपासून सिनेट च्या निवडणुका, पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांच्यातील झलक बघून, हीच लोक त्यांना मंत्री करायचे म्हणत होते. आता निष्ठावान मधला बडगा कसा असतो, किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असा जिव्हारी लागणारा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला.

    मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात जी भेट झाली, ती एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही, त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतात, किंवा राज्यात, देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट घेऊन बोलले असावेत. जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.

    Bharat Gogawle Kishori Pednekar Rashmi Thakare Shivasena Uddhav Thakre
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif