Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा, मात्र..
    राजकारण

    धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा, मात्र..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 29, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव राबवत काल पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्या विषयावरुन बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “धर्माचे नाव देऊन 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतात, मात्र 6 लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत, त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही” अशी टीका बच्चू कडू यांनी केली. “त्यांना देवी-देवतांचे फक्त नाव वापरायचे आहे. लोकांना धर्मामध्ये गुंतून ठेवायचं आहे, पण तो महादेवाचा त्रिशूल शेतकऱ्याच्या छाताड्यात खूपसायचा अशी अवस्था आणली आहे” अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

    “सहा लाख हिंदू आया बहिणींच सिंदूर उधळलं गेलं, त्यावर मोदीजी आणि फडणवीस बोलायला तयार नाही, साधी श्रद्धांजली सुद्धा द्यायला तयार नाही. त्यामुळे असे नवीन नवीन नाव काढत आहेत” अशी टीका बच्चू कडू यांनी केली. “28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली ते मान्य आहे, पण सहा लाख शेतकरी यांनी पाय घासून घासून आत्महत्या केली, त्यांच्यासाठी तुम्हाला सिंदूर आठवत नाही. ते सिंदूर तुम्हाला दिसत नाही, याच्यासारखं दुर्देव काय आहे?” असं बच्चू कडू म्हणाले.

    “सगळ्यांना व्यवस्थित कसे ठेवायचे यासाठी हा खेळ शेवटी भाजपचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा यांचा फोन आला. उद्धव ठाकरे यांनाही शुभेच्छा दिल्या. केंद्रामध्ये उद्या नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांनी हालचाल करू नये, त्यांना व्यवस्थित इशारा या माध्यमातून देण्यात आला” असं बच्चू कडू म्हणाले.

     लोकांना खेळ समजून द्यायचा नाही…

     “तुम हट गये तो मेरे पास पवार साहेब और उद्धव साहेब आहे, अशा प्रकारचे राजकारण भाजप व्यवस्थित खेळत आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे व शरद पवार भाजपाला पाठिंबा देईल असं नाही पण तसं दर्शविले जात आहे. मित्र पक्षांवर दबाव तंत्र आणण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे. लोकांना खेळ समजून द्यायचा नाही. एकंदरीत संभ्रमाचं चित्र भाजप तयार करत आहे” असं बच्चू कडू म्हणाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif