जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून सोन्याच्या दरात 1 हजार 339 रुपयांची वाढ होत थेट 91 हजारांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरातही एकाच दिवसात तब्बल 2 हजार 275 रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीनंतर चांदी जीएसटीसह प्रतिकिलो 1 लाख 4 हजार 545 रुपयांवर पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. यातून जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने गुंतवणूकदार सुरक्षित उपाय म्हणून सोने-चांदी खरेदीकडे वळले असल्याचे समजते.

शनिवार दि. 15 मार्च रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली असून हा आकडा 90 हजारांपेक्षा जास्त महाग झाला आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीमध्ये 1 हजार रुपयाने वाढ झाली आहे. देशाच्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे दर वाढले आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर हा 85 हजार पेक्षा जास्त आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दर किलोग्रॅममागे 1 लाख 3000 रुपये झाला आहे. सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत आणि सेन्सेक्सपासून निफ्टीपर्यंत सर्व काही रेड झोनमध्ये आहे.
हॉलमार्क ही खरी ओळख
सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क तपासूनच दागिने खरेदी करा, कारण ही सोन्याची सरकारी हमी आहे. भारतात, भारतीय मानक ब्युरो हॉलमार्क निश्चित करते. प्रत्येक कॅरेटचा हॉलमार्क नंबर वेगळा असतो, सोने खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे सोने भेसळयुक्त असू शकते, म्हणून ते नेहमी पूर्णपणे तपासल्यानंतर खरेदी करा.


