Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण!
    जळगाव

    नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण!

    आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या : पोलिसांचा लाठीचार्ज

    नंदूरबार | लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरात काही दिवसापूर्वी दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, येथील आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले असून पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर, मोर्चात सहभागी झालेल्यांनी सैरावैरा धावपळ केल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी, पोलिसांनी घटनास्थळी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

    पोलिसांनी जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. या मारहाणीच्या घटनेतील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. नंदुरबार शहरात दोन युवकांच्या हाणामारीत जय वळवी याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, यामुळे आदिवासी संघटना आता आक्रमक झाली असून, आज नंदुरबार शहर बंद ठेवत मूक मोर्चा काढण्यात आला आहे.

    नेमकी घटना काय?
    जय वळवी याच्यावर सूर्यकांत मराठे या आरोपीने चाकूहल्ला करण्यात आला होता. या खाल्ल्यानंतर जय वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे, जय वळवीचा खटला लवकर न्यायालयात चालवावा आणि जय वळवी याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आदिवासी संघटनेची आहे. त्याच अनुषंगाने आयोजित मोर्चात आरोपींना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी काही आंदोलकांनी दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान, आदिवासी संघटनेच्यावतीने मूक मोर्चा काढत आरोपींना कठोर शिक्षा, फाशीची झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.

    Nandurbar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif