Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»एकनाथराव खडसेंच्या घरवापसीचे संकेत!
    संपादकीय

    एकनाथराव खडसेंच्या घरवापसीचे संकेत!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 9, 2026No Comments899 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    भाजपचे जुन्या नेते एकनाथराव खडसे हे गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा भाजप प्रवेश झाला होता, असे म्हणतात. पण त्यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला. किंबहुना, विरोध म्हणण्यापेक्षा, “आम्हाला त्यांचा भाजप प्रवेश झाला आहे याची कल्पनाच नाही. वरिष्ठ पातळीवर त्यांचा भाजप प्रवेश झाला असला, तरी आम्हाला वरिष्ठांकडून काहीही संदेश आलेला नाही,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी व्यक्त केले होते. त्यावेळी लोकसभा निवडणुका होत्या. रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होत्या. त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी जाहीर नाही, पण रक्षा खडसेंचा प्रचार केला होता. त्यावेळी रक्षा खडसेंचा प्रचंड बहुमताने विजय झाला. त्यानंतर त्यांनी केंद्रात राज्यमंत्री म्हणूनही शपथ घेतली. त्या शपथविधी सोहळ्याला नाथाभाऊंचे सर्व कुटुंब उपस्थित होते. पण दरम्यानच्या काळात स्थानिक नेत्यांचा विरोध पाहून एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. वरिष्ठ म्हणतात, नाथाभाऊ यांना भाजप प्रवेश द्यावा; तर महाराष्ट्रातील स्थानिक नेते म्हणतात, “आम्हाला माहीतच नाही.” या सगळ्या वादाला कंटाळून एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यावर विधानसभा निवडणुकीला ऐनवेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी जाहीरपणे रोहिणी खडसे यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. त्यानंतर एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. दरम्यान, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा सुरू असून जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांची भेट घेतल्याचे सर्वश्रुत आहे. त्यानंतर विनोद तावडे हे लगेच एकनाथराव खडसे यांच्या घरी जाऊन नाथाभाऊंची भेट घेतली. यासंदर्भात नाथाभाऊ म्हणाले, “ही आमची भेट खाजगी होती. माझ्या तब्येतीसंदर्भात विचारपूस करण्यासाठी विनोद तावडे यांनी ही भेट घेतली.” परंतु असे असले, तरी दोन वर्षांच्या कालावधीनंतर विनोद तावडे यांची भेट होते, तेव्हा या भेटीत तब्येतीबरोबरच राजकीय चर्चा झाल्या असणार, यात वाद नाही. विनोद तावडे यांनी नाथाभाऊंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी नाथाभाऊ हे बसलेले होते आणि तावडे हे उभे राहून त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत. त्यानंतर त्यांची बराच काळ चर्चा झाली. या चर्चेत निश्चित नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा झाली असणार. मागील वेळेलाही विनोद तावडे यांनीच पुढाकार घेतला होता. त्यावेळी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले होते. पण बऱ्याच वादविवादानंतर नाथाभाऊ स्वतः कंटाळून, “मी आता भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. स्थानिक नेत्यांचा विरोध असेल, तर माझ्या भाजप प्रवेशाला काही अर्थ नाही,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते. स्थानिक पातळीवर नेत्यांनी नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. तो विरोध स्थानिक राजकारणामुळे होता, हे सर्व जगजाहीर आहे. आता पुन्हा एकदा विनोद तावडे यांनी नाथाभाऊंच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून चर्चा केली, म्हणजे नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाला पुन्हा एकदा चर्चेचे उधाण लागले आहे. आता या चर्चेनंतर त्यांना विरोध करण्याची कुणा स्थानिक नेत्यांची हिम्मत होणार नाही.

    नाथाभाऊ खडसे हे शारीरिकदृष्ट्या खचले आहेत. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही. अशा परिस्थितीत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे योग्य होईल, म्हणून विनोद तावडे यांनी बेरजेचे राजकारण करत आहेत, ते ठीकच आहे. एकेकाळी नाथाभाऊंनी भाजपसाठी स्वतःचे रक्त आटवले आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढावा म्हणून त्यांनी आपल्या जीवाची पराकाष्ठा केली आहे. 2019 च्या निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळावे म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्याच जोशामध्ये येऊन त्यांनी, “शिवसेनेची युती मी तोडली,” असे जगजाहीर केले होते. परंतु भाजपला बहुमताने हुलकावणी दिली. थोडी मते त्यांना कमी पडली. त्यामुळे शेवटी त्यांना शिवसेनेची साथ घ्यावी लागली. या कालावधीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकनाथराव खडसे होते. त्यांनी त्या दृष्टीने हालचालीदेखील सुरू केल्या होत्या. परंतु दिल्लीकरांच्या मनात फडणवीस हे नाव होते आणि त्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला. खडसे बिचारे मागे पडले, पण महसूलसह आठ खात्यांचे मंत्री झाले. सक्षमपणे त्यांनी आठ खात्यांच्या मंत्रिपदाचा कारभार चालवला. परंतु दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुणे येथील भोसरी एमआयडीसीमधील जमीन घोटाळा काढण्यात आला. अंजली दमानिया उपोषणाला बसल्या आणि नाथाभाऊंना नको असलेला काटा आपोआप काढला गेला. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते पक्षात झगडत राहिले. पण पक्षातून ढकलून देण्यात येत आहे, असे वाटल्याने त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि पक्षाबाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे त्यांचा प्रवास आहे. ते प्रकृतीने खचले आहेत. अशातच त्यांना भाजपमध्ये घेऊन एक वेगळा आनंद विनोद तावडे देऊ इच्छितात. बघूया, काय होते ते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif