Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»महाराष्ट्रात दुष्काळाचे हाहाकार उडवणारे संकेत!
    हवामान

    महाराष्ट्रात दुष्काळाचे हाहाकार उडवणारे संकेत!

    मान्सून हंगामात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 12, 2026Updated:June 12, 2026No Comments1,037 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    युरोपियन युनियनची हवामान संस्था कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने नुकताच केलेल्या आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, भारताच्या आगामी मान्सून हंगामात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीव्र दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. एल निनोचा हा तडाखा असल्याचे सांगण्यात आले. गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात दुष्काळ पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. देशात मॉन्सून दाखल झाला. मात्र, मॉन्सून एकाच जागी रेंगाळत आहे. मोठा फटका यामुळे बसतोय. त्यामध्येच आता जो इशारा देण्यात आला. त्याने झोप उडाली. जागतिक मॉडेल्स विश्लेषक यांच्या म्हणण्यांनुसार, यावर्षी भारतात मोठ्या भागांमध्ये पाऊस कमी होईल. रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, प्रशांत महासागरात खतरनाक एल निनो सक्रिय झाला. त्याचा परिणाम भारतातील मॉन्सूनवर होईल.

    हा अंदाज खरा ठरला तर करोडो शेतकरी आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. मल्टी मॉडेल वेदर मॅप्सनुसार, यावर्षी भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात पाऊस खूप कमी होण्याचे संकेत आहेत. याचा एल निनोचा परिणाम होणाऱ्या राज्यांची नावे पुढे आली आहेत. त्यानुसार, गुजरातला याचा सर्वाधिक फटका बसेल. कोकण आणि गोव्यातही परिणाम असेल. महाराष्ट्रात सर्वाधिक चिंता व्यक्त करण्यात आली. येथे पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे.

    हवामान वैज्ञानिक यांच्या म्हणण्यांनुसार, भारतात मॉन्सून कमी झाला किंवा दुष्काळ पडला तर एल निनो त्याकरिता कारणीभूत असेल. यादरम्यान तापमानात खूप जास्त वाढ होते. 2026 च्या डेटानुसार, एल निनो तीव्रपणे सक्रिय होत आहे. ज्यामुळे भारताच्या दिशेने येणारे मॉन्सूनचे ढग कमकुवत होत आहेत. या एल निनोमुळे अनेक देशातील जलपातळी खूप जास्त कमी होऊ शकते.

    फक्त ग्रामीण भागच नाही तर मुंबई दिल्ली यासारख्या शहरांमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासोबतच संपूर्ण भारतात एकसारखी स्थिती राहणार नाही. या इशाऱ्यानंतर देशात टेन्शन वाढलंय. अनेक हवामान संस्थांनी भारताबद्दल हाच अंदाज दिला. भारतातील काही राज्यात मोठा दुष्काळ पडण्याचे संकेत देण्यात आले. यासोबतच आज 12 जून असतानाही मॉन्सूनचा पाऊस पडताना दिसत नाहीये.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!

    August 11, 2026

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पावसाची नोंद

    August 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif