Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»अमूलच्या बटर आणि तुपाच्या किमतीत मोठी वाढ
    लोकार्थ

    अमूलच्या बटर आणि तुपाच्या किमतीत मोठी वाढ

    ऐन दिवाळी सणाच्या काळात अमूलच्या ग्राहकांना धक्का
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 4, 2026No Comments110 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिवाळी सण तोंडावर असताना महागाईचा मोठा झटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दिवाळीमध्ये गोडधोड तयार करण्यासाठी तूप आणि बटर जास्त लागते. शिवाय घरी पाहुणे मंडळी येतात, त्यांनीही चमचमीत खाऊ घालण्यासाठी तूप, बटर अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात लागतात. त्यातच आता अमूलने सणावाराच्या पार्श्वभूमीवर थेट किंमतीमध्ये मोठी वाढ केली.

    अमूल तूप आणि बटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीने मोठा दणका दिला. थेट 50 रूपयांनी त्यांनी वाढ केली. 500 ग्रॅम बटर पॅक थेट 15 रूपयांनी महाग केला. थेट 15 रूपयांनी याची किंमत वाढवली. जवळपास वस्तूंवरील किंमत अमूलने वाढवली. अमूलने तूप आणि बटरवरील किंमतीत वाढ केली. 1 किलोचा तूपाचा डब्बा आता 680 रूपयांना मिळेल. जो आधी 630 रूपयांना मिळायचा. आता हा पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचे 50 रूपये मोजावी लागणार आहेत.

    500 ग्रॅमच्या तूपाच्या पाकिटाची 325 हून 345 किंमत वाढवण्यात आली. बटरचे पॅकेट 63 हून 66 वाढवण्यात आले. 500 ग्रॅमचे पॅक 310 हून 325 करण्यात आले. हेच नाही तर अमूलने गायीचे तूप 740 प्रती लीटर हून 710 केला. म्हशीचे तूप 700 हून 720 करण्यात आले. गुजरात आणि राजस्थानमध्ये भेसळीखोरी विरोधात जोरदार कारवाई केली जात आहे.

    त्याच पार्श्वभूमीवर हवे तेवढ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे कंपनीने किंमती वाढवल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पुरवठा हवा तसा होत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

    शिवाय सणाच्या तोंडावर तूप आणि बटरची मागणीही खूप जास्त असते. जवळपास गोड पदार्थ तयार करण्यासाठी तूपाची आवश्यकता असते. लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. त्यातच अमूलने ग्राहकांना धक्का दिला. अमूलचे बटर आणि तूपच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली. अमूलसोबतच इतरही कंपन्या किंमतीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन दिवाळीत हा ग्राहकांसाठी मोठा झटका म्हणावा लागेल.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif