Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अध्यात्म»भक्तांच्या हाकेला पावणारी “सिद्धगड भवानी देवी”
    अध्यात्म

    भक्तांच्या हाकेला पावणारी “सिद्धगड भवानी देवी”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2025Updated:September 23, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला सिद्धगड भवानी माता मंदिरात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन तसेच जामनेर नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

    खान्देश आणी विदर्भ तसेच मराठवाडा सिमेवर जामनेर शहरापासून किमान १० ते १२ किमी अंतरावरील डोंगरावर वसलेल्या लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगड” बिड भवानीदेवी”हि नेहमीच भक्तांनी आवाज दिला तर त्यांच्या हाकेला साद देऊन पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर सिद्धगडावर विकासकामे पूर्णत्वास येत गडाचा कायापालट केला जात आहे. सिद्धगडावर भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांना खुली करण्यात आली आहेत.

    नवरात्रीच्या काळात गडावर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तर भाविक भक्त मोठ्या भक्तीभावाने देवीला साकडे घालतात व भवानी माता त्यांच्या मागलेल्या मागण्या पूर्ण करते हि खरी श्रद्धा भक्त मानतात. देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महिला भाविकांच्या वतीने देवीला खणं नारळाची अर्पण करुन आशिर्वाद मागला जातो. देवीची मोठी आख्यायिका सांगितली जाते तर पुरातन काळापासून चाललेली परंपरा आजही टिकून राहण्यासाठी मोठे प्रयत्न ना. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून होत आहेत. पंधरा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असुन मोठ्या भक्तीभावाने शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तर विविध प्रकारच्या दुकाने प्रतिष्ठाने परराज्यातील व्यवसायीक व व्यापाऱ्यांकडून थाटली जातात.

    प्रामुख्याने प्रसाद खणं नारळ ओटी तसेच खाद्य पदार्थ खेळणी कटलरी संसारोपयोगी साहित्य कॉस्मेटिक यांची दुकाने पहायला मिळतात. त्याचप्रमाणे गडावर येणाऱ्या भाविकांना निवारण्यासाठी प्रशस्त अशा भक्तनिवास बांधले असुन अनेक प्रकारच्या वास्तु नजरेस पडतात. गडाचा परीसर निसर्गरम्य तर असतो तर हिरवा शालू पांघरण्याप्रमाणे डोंगराळ भाग निसर्ग प्रेमींना भुरळ घालतो. एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जाग्रुत देवस्थाने सुबक मंदिरे आणी अनेक देवदेवतांच्या थक्क करणार्‍या आख्यायिकांकरीता काही परीचित तर ही देवस्थाने प्राचीन सुंदर मुर्ती जुनी मंदिर त्यांच्याशी जोडला गेलेला इतिहास तसेच निसर्गवेल अशा गोष्टींचा मिलाफ जर पहायचा असेल तर एकदा “सिद्धगड भवानी (बिड) येथे यायलाच हवे.

    नवसाला पावणारी आई

    गडावर येताच पायर्‍या उतरून खाली येताच नजरेस पडते ते भवानी मातेचे शोभनीय मंदिर आणी त्यात विराजमान झालेली “नवसाला पावणारी आई” देवीची मूर्ती भव्य मुखावरचा विशाल भालप्रदेश सरळ नासिका तेजस्वी नेत्र शिरस्यानी मुकुट त्याच प्रमाणे नाकातील नथ गळ्यातील अलंकार या आभुषणांनी देवीचे रुप प्रसन्न वाटते. परीसरात पवन पुत्र हनुमान सिद्धिविनायक गणपती कालिंका भैरवनाथ महादेव शंकर पार्वती शनैश्वर यांच्या सह अनेक मंदिरे आकर्षित करतात.

    सिद्धगडावर विकासकामे युद्धपातळीवर

    सिद्धगडावर विकासकामे युद्धपातळीवर सुरू असुन लवकरच सिद्धगडाचे काम ना. गिरीष महाजन यांनी हाती घेतले आहे. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सभामंडप, प्रशस्त वाहनतळ, भक्तांना मुक्कामासाठी भक्तनिवास, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची टाकी, रस्ता, बालगोपाळांना मनसोक्तपणे खेळण्यासाठी प्ले सेंटर, मनमोहक बाग बगीचा, तसेच अन्य विकास कामे वेगाने सुरू आहेत.

    भाविकांच्या सुविधांवर लक्ष : मंत्री महाजन

    मंत्री गिरीश महाजन हे या सिद्धगड ” बिड” मंदिर विश्वस्ताचे अध्यक्ष असुन गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेता यावे यासाठी शिस्त तसेच कुठल्याही प्रकारची भाविकांना गैरसोय व अडचण निर्माण होऊ नये म्हणून ना. गिरीष महाजन हे सातत्याने लक्ष ठेऊन असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक तसेच मोठी फौज कार्यरत राहुन भाविक भक्तांना सेवा पुरवित असतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif