वडिलांचे ते शब्द; आणि शुभमन ने ठोकले द्विशतक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रिकेट विश्वात कालपासून सर्वात प्रसार माध्यमे व वृत्तपत्रात शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाची चर्चा आहे. शुबमनने न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार खेळी करत द्विशतक ठोकले आहे. शुबमन हा कारनामा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. तसेच सर्वात कमी वयात द्विशतक करणारा फलंदाजही ठरला. शुबमनच्या कामगिरीमुळे त्याच्या वडिलांचे नाव पुढे येत आहे.

शुबमनने श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलं. श्रीलंका विरुद्ध 15 जानेवारीला झालेल्या या सामन्यात शुबमनने 116 धावांची खेळी केली होती. गिलचं मायदेशातील हे पहिलंवहिलं शतक होतं. मात्र यानंतरही गिलचे वडील लखविंदर सिंह (Lakhwinder Singh) हे आनंदी नव्हते. एका मुलाखतीत बोलताना पंजाबचे क्रिकेटर गुरकीरत मान यांनी याबाबतचा खुलासा केलां.

काय म्हणाले शुबमनचे वडील?
“तुम्हीच पहा तो कसा आऊट झाला. शुबमनने शतक पूर्ण केलं. मात्र त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी होती. द्विशतकासाठी आवश्यक तितका वेळ त्याच्याकडे होता. त्याला कायम अशी सुरुवात मिळणार नाही. तो केव्हा शिकणार”, असं लखविंदर म्हणाले असल्याचं गुरकीरत यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

वडिलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरच्या अवघ्या 72 तासातच शुबमनने 18 जानेवारीला 208 धावांची धमाकेदार खेळी केली.“शुबमनकडून त्याच्या वडिलांना फार आशा होत्या. आता लेकाच्या द्विशतकानंतर ते आनंदी असतील अशी आशा आहे. गिलचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही. शुबमनने पहिलं एकदिवसीय शतक झिंबाब्वे विरुद्ध केलं. शुबमनने ते शतक वडिलांना समर्पित केलं. माझे वडीलच माझे कोच आहेत, असं गिल म्हणाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.