Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धीवरे
    ताज्या बातम्या

    जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धीवरे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 21, 2026No Comments233 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे गुन्हे शाखेच्या अधीक्षकपदी बदली

    जळगाव : भारतीय पोलीस सेवेतील नऊ अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या असून त्यात जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पोलीस अधीक्षकपदावर धुळ्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॅशिंग तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून धीवरे यांची धुळे जिल्ह्याला ओळख आहे.
    महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
    जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली सांगली येथे करण्यात आली असून पुणे येथील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) पदावर करण्यात आली आहे.
    कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून (तात्पुरत्या स्वरूपात) जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक एम. सेरा यांची पदोन्नतीसह पोलीस अधीक्षक, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) करण्यात आली असून धुळेचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती जळगाव येथे करण्यात आली आहे. पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
    या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif