श्रेयस अय्यरची दमदार खेळी, वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी दावा मजबूत

0

इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्टेलिया कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल सलामी जोडी बॅटिंगसाठी आली. मात्र ऋतुराजला पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आलं. ऋतुराज अवघ्या ८ धावांवर आउट झाला.

ऋतुराजनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयस आणि शुबमन या दोघांनी तिथूनच कांगारूंचा पराभव करायला सुरुवात केली. पावरप्लेमधील १० ओव्हरमध्ये गिल-अय्यरने फटकेबाजी करत इंडियाला चांगल्या स्थिती आणून ठेवलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा बॅटने हाणामारी सुरूच ठेवली. या दरम्यान गिल-श्रेयसने अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर दोघांनी टॉप गिअर टाकला. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे शुबमन आणि श्रेयस दोघांपैकी आधी शतक कोण मारणार अशी स्पर्धा झाली. मात्र श्रेयसने यात बाजी मारली.

श्रेयसने ८६ बॉलमध्ये ३ सिक्स आणि १० चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. श्रेयसने ११६ च्या स्ट्राईक रेटने हे शतक ठोकल. श्रेयसच्या वनडे कारकिर्दीतल हे तिसरं शतक ठोकल्यानंतर आउट झाला. मात्र गोलंदाजाने अर्धवट कॅच पकडल्याने त्याला नाबाद घोषित केलं. त्यानंतर श्रेयसने एक चौकार ठोकला. मात्र त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आउट झाला. श्रेयसला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र त्याला तसं करत आलं नाही. श्रेयस ९० बॉलमध्ये १०५ धावा करून माघारी परतला.

Leave A Reply

Your email address will not be published.