thingz gifts carousel haig whiskey gift set gay wedding gift ideas crest spinbrush coupon rally driving gift days
Thursday, December 1, 2022

श्रद्धा हत्या प्रकरणी आरोपी आफताबला फाशी द्या : भडगांव महिला दक्षता समितीचे निवेदन…

- Advertisement -

 

- Advertisement -

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

वसई येथील श्रद्धा वालकरची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी आफताब अमिन पूनावाला यास फाशी द्या. अशी मागणी महिला दक्षता समितीने केली आहे. अत्यंत कृरतेने श्रद्धा वालकरचा गळा दाबून नराधम आरोपी आफताबने दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या करून शरीराचे 35 तुकडे केले. एक एक करून मेहरौली जंगलात तसेच शहराच्या अनेक भागात फेकून दिले. अत्यंत संतापजनक घटनेचा खटला फास्ट ट्रकमध्ये घेऊन अत्यंत निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपीला तात्काळ फासावर लटकवा.

- Advertisement -

अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्या. अशा मागणीचे निषेध निवेदन भडगांव पो.स्टे.दक्षता अध्यक्षा योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या रेखा पाटील, चंदा पाटील, अलका कोळी, मनीषा सावळे आदी महिला सदस्यांनी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या