Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार
    मनोरंजन

    हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 9, 2026No Comments13 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    हॉलिवूडची प्रसिद्धी गायिका रिहानाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील बेवर्ली हिल्स येथे ही घटना घडली. ३० वर्षांच्या एका महिलेने गायिकेच्या घरावर एक- दोन नाही तर तब्बल १० गोळ्या धाडधाड झाडल्या. ही घटना घडली त्यावेळी गायिका घरामध्येच होती. ही घटना ८ मार्चला दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारामध्ये गायिका रिहानाला काही झाले नाही. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

    लॉस एंजेलिस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारानंतर लगेचच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच ठिकाणी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. या महिलेनेच हा गोळीबार केला असल्याचे समोर आले.

    पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला आपल्या कारमध्ये होती. तिने कारच्या आतूनच रिहानाच्या घरावर गोळीबार केला. त्यानंतर ती घटनास्थळावरून फरार झाली. प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, महिला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये होती आणि तिने रिहानाच्या घरावर १० गोळ्या झाडल्या. या महिलेने कारमध्ये बसूनच रिहानाच्या घरावर गोळ्या झाडल्या.

    ३८ वर्षीय रिहाना तिचा पार्टनर रॉकी आणि ३ मुलांसह राहते. गोळीबाराची घटना घडली त्यावेळी ती घरामध्ये होती. या गोळीबाराच्या घटनेनंतर रिहानाचे चाहते चिंतेत आले होते. पण ती सुरक्षित असल्याचे कळताच त्यांना दिलासा मिळाला. या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झाले नाही. आरोपी महिलेने रिहानाच्या घरावर गोळीबार का केली? या मागचे कारण काय आहे याचे कारण उघड झाले नाही. लॉस एंजेलिस पोलिस या प्रकरणाच तपास करत आहेत. रिहानाने देखील या घटनेवर अद्याप अधिकृत विधान केले नाही.

    #police #singer America Beverly Hills Hollywood Los Angeles Rihanna Shooting
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026

    आरोपीचा भररस्त्यात वाढदिवस : पोलिसांनी भरवला केक

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.