Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»पेट्रोल डिझेलचा तुटवडा, एक भयावह स्थिती!
    संपादकीय

    पेट्रोल डिझेलचा तुटवडा, एक भयावह स्थिती!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2026No Comments239 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख 

    चौथ्यांदा पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे. आता सीएनजीचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोल पंपांवर रांगांच्या रांगा लागत आहेत. काही पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल अभावी बंद पडले आहेत. सरकार म्हणते की, पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही. ही कृत्रिम टंचाई आहे. ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल मिळत नाही तेथे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचे वितरण केले जाईल. हे सर्व ठीक असले तरी आमचा शेतकरी मात्र डिझेल पासून वंचित आहे, हे खरे आहे. शेतकरी आता कॅन घेऊन रांगा न लावता आपले ट्रॅक्टर, जेसीबी किंवा इतर वाहने घेऊन पेट्रोल पंपावर येत आहेत. तेथे त्यांना रांगा लावून पेट्रोल व डिझेलचा भरणा केली जात आहे. सध्या शेतीमध्ये मशागतीचा पीक पिरेड आहे. अशा वेळी त्यांना डिझेल मिळाले नाही तर शेतीची कामे बंद पडतील. त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत. पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरणारे काही लोक तेथील कर्मचाऱ्यांवर धाक दाखवतात, अपशब्द वापरतात आणि पेट्रोल मिळवतात. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली जाते. जळगावच्या एका पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी चाकूने देखील भोसकले. अशा वेळी इंधन मिळविण्यासाठी जर मारामारी कराव्या लागत असतील तर हे चित्र अत्यंत विदारक आहे, असे म्हटले पाहिजे. अन्न मिळवण्यासाठी मारामारी होते असे आपण म्हणतो. पण इंधन मिळवण्यासाठी टोकाची भूमिका घेऊन हाणामारी होत असेल तर ते चित्र भयावह आहे..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif