Sunday, November 27, 2022

दुकानाला भीषण आग; १० लाखांचे नुकसान

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

पाचोरा शहरातील सु. भा. पाटील काॅम्प्लेक्समधील एका दुकानात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानास वेढा घातल्याने दुकानातील फर्निचरसह इतर साहित्य जळुन खाक झाले. अग्निशमन दलाचे बंब वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणल्याने आजु बाजुची दुकाने वाचविण्यास त्यांना यश आले आहे. या आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज दुकान चालक यांनी बोलून दाखविला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सु. भा. पाटील काॅम्प्लेक्समध्ये महिलांचे साज शृंगारासाठी साहित्यांचे “दुल्हन एम्पोरियम” नामक दुकान आहे. नेहमी प्रमाणे दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दुकान वाढवुन घरी गेले. दरम्यान रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दुल्हन एम्पोरियम या दुकानातुन धुर निघत असल्याचे तेथुन जाणारे दिनेश जैन यांनी दुकानाचे चालक पिंकी राहुल जैन यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले होते. या आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुल्हन एम्पोरियमचे प्रो. प्रा. पिंकी राहुल जैन यांनी वर्तवला आहे. सुदैवाने या आगीत जिवितहानी झाली नसुन शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या