Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बापरे! विद्यार्थ्यांनीच केला महिला मुख्याध्यापकाचा खून
    गुन्हे वार्ता

    बापरे! विद्यार्थ्यांनीच केला महिला मुख्याध्यापकाचा खून

    थेट 27 वेळा चाकूने सपासप वार : कारण ऐकून व्हाल थक्क
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 20, 2026No Comments1,484 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    खासगी शाळेतील मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांची राहत्या चाकूने सपासप वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांड प्रकरणात त्यांच्या शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. घरात चोरी पकडल्यानंतर विद्यार्थ्यांनीच हत्या केल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापकाच्या हत्येने शिक्षणक्षेत्राच खळबळ उडाली आहे. हैदराबादच्या नलगोंडा जिल्ह्यातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक रुपा या 11 ऑगस्ट रोजी घरात एकटी असताना मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्यावर चाकूने 27 वेळा चाकूने वार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी सांगितली. त्या दिवशी रुपा या घरात तिच्या मावशीसोबत फोनवर बोलत असल्याचे तपासातून समोर आलं आहे. फोन बंद होण्याआधी शेवटच्या फोन संभाषणात मावळीसोबत बोलताना ‘बाबू’ हा शब्द उच्चारला होता. बाबू हा शब्द विद्यार्थ्यांना संबोधण्यासाठी सर्रास वापरला जातो. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    पोलिसांच्या तपासाला दिवसेंदिवस गती मिळत आहे. दररोजच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांशी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. खरंतर मुलं हत्याकांडानंतर दोन मुले भरमसाट पैसे उधळू लागले होते. त्याचबरोबर मित्रांसोबत पार्टी करत होते. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. पोलिसांनी सांगितले की, या हत्याकाडांनंतर विद्यार्थी अचानक पैसे उधळत होते. त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करत होते. यामुळे दोघांवर संशय वाढला. त्यानंतर आम्ही दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं, असे नलगोंडाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

    पोलिसांनी आरोपींकडून 1.51 लाख रुपयांची रोकड आणि एक आयफोन जप्त केला आहे. हत्याकांडानंतर पैसे पालकांना दिल्याचा दावा मुलांनी केला होता. या पैशांवर मानवी रक्तांशे अंश आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले. दोन्ही मुलांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यातील एकाला बाईक आणि कार चालवण्याची आवड होती. त्याला झटपट पैसे कमवायचे होते, असेही पोलिसांनी सांगितले.

    मुख्याध्यापकाची हत्या करण्याआधी दोघे त्यांच्या घरावर लक्ष ठेवून होते. त्यांनी हत्येच्या 5 दिवस आधी त्यांना संपवण्याचा कट रचला होता. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी दोन्ही अल्पवयीन मुलांनी हातमोजे वापरले होते. सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणाची देखील पाहणी केली होती.

    या दोघांनी 11 ऑगस्ट रोजी एका विद्यार्थ्याने घराच्या कपाऊंडची भिंत ओलांडून घरामध्ये प्रवेश केला होता. तर दुसरा घराबाहेर थांबला होता. घरात शिरल्यानंतर अल्पवयीन मुलाने चोरी करण्यास सुरुवात केली. परंतु चोरी करताना मुख्याध्यापकाला विद्यार्थी दिसला. त्यानंतर त्याने मुख्याध्यापकावर चाकूने 27 वार केले. त्यानंतर घरातील अडीच लाख रुपये घेऊन फरार झाला. हत्येनंतर पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif