Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक! पोलिसाच्या घरावरच दरोडा
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक! पोलिसाच्या घरावरच दरोडा

    एकाकडे बंदूक, एकाकडे सूरी... पोलिसाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 20, 2026No Comments409 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील नशिराबाद येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच दोन अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. यावेळी या दरोडेखोराच्या हातात बंदूक आणि सूरी असल्याने परिस्थिती आणखी भीतीदायक निर्माण झाली होती. एका दरोडेखोराने तर पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या गळ्याला सुरी लावत घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने काढून देण्याची धमकी दिली. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत डायल 112 वर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि मोठा अनर्थ टळला.

    जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील मुक्तेश्वरनगर परिसरात गणेश साहेबराव कोळी यांचे घर आहे. गणेश साहेबराव कोळी हे स्वतः पोलीस नाईक आहे. कोळी हे सध्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नातेवाइकाचे निधन झाल्याने ते अंत्यसंस्कारासाठी नशिराबाद येथे आले होते. बुधवारी कुटुंबीयांसह घरी असताना रात्री साडेआठच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी सशस्त्र घरात प्रवेश केला. घरात शिरताच एका दरोडेखोराने कोळी यांच्या पत्नीच्या गळ्याला थेट सुरी लावली. दुसऱ्याने हातातील बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली. अचानक घरात घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    यावेळी घरातील टेबलवर ठेवलेली गणेश कोळी यांच्या कारची चावी दरोडेखोरांच्या हाती लागल्याने कारची चावी घेऊन ते घराबाहेर पडून कारमधून भादली रस्त्याच्या दिशेने सुसाट निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर दरोडेखोरांनी मन्यारखेडा शिवारात अंधाराचा फायदा घेत कार सोडून दिली. त्यानंतर दोघांनीही शेतातून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सोडून दिलेली कार ताब्यात घेतली असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

    …अन्‌‍‍ मोठा अनर्थ टळला

    दरम्यान, दरोड्याच्या वेळी गणेश कोळी यांच्या अंगावर सोने आणि हातात अंगठ्या होत्या. दरोडेखोरांचे लक्ष त्यांच्याकडे जाताच कोळी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. त्यानंतर बाथरूममधूनच त्यांनी डायल 112 या पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधत घरात दरोडेखोर शिरल्याची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी बाथरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. परंत, प्रयत्न करूनही दरवाजा तुटला नाही. पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याची कुणकुण दरोडेखोरांना लागताच अधिक वेळ न घालवता ते घरातून पसार झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif