धक्कादायक…! मैत्रिणीवर बलात्कार; चित्रफित केली व्हायरल…

0

 

आकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क;

प्रेम जगातील सर्वात सुंदर गोष्ट असते. जो व्यक्ती आपल्याला भावतो, ज्याचा सहवास हवाहवासा वाटत राहतो. अश्या पवित्र नात्याला अमिषाच्या आणि शरीर सुखाच्या लालसेने एका नराधमाने आपल्याच मैत्रिणीवर बलात्कार करून तिची चित्रफीत काढून ती समाजमाध्यमात प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रतीक गजानन मानकर (२२) याला पोलिसांनी अटक केली.

शेगाव येथे दर्शनासाठी येण्याची गळ घालून युवकाने २० वर्षीय पीडित युवतीला लॉजवर नेले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. डिसेंबर २०२१ ते ३ ऑगस्ट २०२२ दरम्यान त्याने हे कृत्य वारंवार केले. त्याची चित्रफीत देखील काढली. युवतीने नेहमी येण्यास नकार दिल्याने आरोपीने ती चित्रफीत ‘व्हॉटस्ॲप’वर ‘स्टेटस’ ठेवून प्रसारित केली. याप्रकरणी पीडित युवतीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रतीक मानकर रा. वाडेगाव जि. अकोला याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.