धक्कादायक; फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मुंबईच्या शिवाजी नगरमध्ये दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यावरून झालेला वाद इतका वाढला की 3 अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतला. शिवाजी पोलीस ठाण्याजवळ 3 अल्पवयीन मुलांनी लाथ मारून, धक्काबुक्की आणि भोसकून खून केला, सुनील शंकर नायडू असे मृताचे नाव आहे. ही बाब इमारत क्रमांक 15 बी, नटवर पारेख कंपाऊंडमधील सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास असून तेथे फटाके फोडण्यावरून वाद झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक 12 वर्षांचा मुलगा काचेच्या बाटलीत फटाके फोडत होता, त्याला सुनील नायडू यांनी नकार दिला आणि तेथून पळवून लावले, त्यानंतर 12 वर्षांचा अल्पवयीन मुलगा त्याच्या 15 वर्षाच्या भावाला व एक 14 वर्षांचा मित्राला घेऊन आला. आणि सुनील नायडू यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तिघांनी मिळून आधी लाथा-बुक्क्यांनी जोरदार वार केले, त्यानंतर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने जखमी सुनीलला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.

मृत सुनील नायडू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. आकाश मंडल हा काचेच्या बाटलीत फटाके फोडणारा १२ वर्षांचा मुलगा. आकाशच्या भावाचे नाव विकास मंडल (१५) असून त्याच्या १४ वर्षांच्या मित्राचे नाव विकास शिंदे आहे. तिघांनीही आधी सुनील नायडू यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी वार केले, त्यानंतर त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.