Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पळासखेडे येथे विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    पळासखेडे येथे विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 27, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पळासखेडे येथे विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू

    शेतातील फवारणीदरम्यान दुर्दैवी घटना

    जामनेरI लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. २६) दुपारी साडेबारा वाजता शेतात फवारणी करत असताना विजेचा जबर धक्का बसून अमोल भास्कर सपाटे (वय ३४) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सपाटे यांनी गावातीलच एका शेतकऱ्याचे शेत निम्मे बटाईने घेतले असून तेथे कापसाची लागवड केली आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते तणनाशक औषधाची फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते. फवारणीचा पंप भरण्यासाठी ते विहिरीजवळ आले असता विजेचा धक्का बसल्याने ते कोसळले.

    दरम्यान, शेजारच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने ही घटना पाहून तत्काळ धाव घेतली आणि डिपीजवळ जाऊन वीजपुरवठा खंडित केला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून अमोल सपाटे यांना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.

    अमोल सपाटे यांच्या पश्चात आई, पत्नी, मोठा भाऊ, बहिणींसह दोन मुली व वर्षभराचा मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो.हे.कॉ. दीपक जाधव करीत आहेत.

    #crime jalgaon Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif