Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 13, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू

    जळगाव – रस्त्यावर बॅनर लावत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने अनिल पापा गवळी (वय ५२, रा. कांचननगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    अनिल गवळी हे कांचननगर येथे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. बॅनर आणि जाहीराती लावण्याचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी सकाळी ते कुसुंबा येथे लोखंडी फ्रेमवर बॅनर लावत असताना, अचानक जवळून गेलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

    त्यामुळे ते उंचावरून खाली कोसळले आणि जागीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अनिल गवळी यांना जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती
    याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif