शिवशाहीला भीषण अपघात; १ ठार तर २२ प्रवासी जखमी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अपघाताची मालिका राज्यात थांबण्याच नाव घेत नाहीये. त्यातच आज मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही एसटी बसला अपघात भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बस ही अक्षरशः महामार्गावर रस्त्याशेजारी उलटली गेली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 22 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून-महाडच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते. मात्र कर्नाळा घाट परीसरात या बसला भीषण अपघात झाला. बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अपघातात 40 पैकी 22 प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.