विधान परिषद निवडणूक:शिवसेनेकडून चंद्रकांत रघूवंशी यांच्या नावांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर संभ्रम
विधान परिषद निवडणूक:शिवसेनेकडून चंद्रकांत रघूवंशी यांच्या नावांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर संभ्रम
मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असून, शिवसेनेने चंद्रकांत रघूवंशी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, भाजपने आपल्या तिन्ही उमेदवारांची निवड जाहीर केली आहे. १६ रोजी संजय किणीकर , संदीप जोशी , दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा केली होती . आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कोअर कमिटीने झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पक्षांतर्गत मतभेदांमुळे झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी न मिळण्याची शक्यता आहे. पक्षाकडून इतर पर्यायांचा विचार सुरू असून, उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा जिंकतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मतदान प्रक्रिया महत्त्वाच्या तारखा:
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: 17 मार्च
अर्ज छाननी: 18 मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 20 मार्च
मतदान: 27 मार्च