Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»शिव रस्ता मोकळे करणे अभियानंतर्गत ७ रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी
    अपघात

    शिव रस्ता मोकळे करणे अभियानंतर्गत ७ रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025Updated:March 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिव रस्ता मोकळे करणे अभियानंतर्गत ७ रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी

    जळगाव ;-  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काही दिवसांपुर्वी दिल्या होत्या.

    त्याअनुषंगाने महसूल विभागाने शनिवारी यावल तालुक्यात विशेष अभियान राबवून विविध गावातील बंद असलेले सात शीव रस्ते मोकळे केले.
    तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी मीना तडवी, मंडळाधिकारी बबीता चौधरी यांनी स्थानिक तलाठ्यांच्या मदतीने शनिवारी ही विषेश मोहिम राबविली.

    यात सात बंद शेत रस्ते मोकळे करण्यात आले. रस्ता अडवणारे शेतकरी, गावातील सरपंच, पदाधिकाऱ्यां यांना विश्वासात घेत यशस्वीरित्या ही मोहिम राबविण्यात आली.

    यात बामणोद ते म्हैसवाडी (२ किमी), सांगवी बुद्रुक ते डोंगरकोठारा (१ किमी), पिंप्री शेत पाणंद रस्ता (२ किमी), डांभुर्णी शेत पाणंद रस्ता (१ किमी), किनगाव ते कासारखेडा (दीड किमी), सावखेरसीम ते चुंचाळे शिव रस्ता (दीड किमी), यावल शिव रस्ता (१ किमी)मोकळा करण्यात आला. या सर्व रस्त्यांची एकूण लांबी १० किमी आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून शेत रस्ते बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून आत शेतामध्ये जायचे असल्यास रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे शेतात, वस्तीवर तसेच राहण्याच्या जागेवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असत. पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातून चिखल तुडवत जावे लागत मात्र असत . प्रशासनाने अतिक्रमणे काढून रस्ता खुला करून दिला आहे. त्यामुळे २१० शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शेतातील पीक, मालवाहतुकीसाठी होणारा त्रास आता या अभियानामुळे कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेत रस्ते मोकळे करण्याच्या अभियानाचे स्वागत केले.

    या मोहिमे दरम्यान, किरकोळ वादातून कित्येक वर्षांपासून हे रस्ते बंद होते. ते रस्ते खुले करण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना सोबत घेतले. बंद रस्ते मोकळे केल्यास होणारे फायदे पटवून दिले. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले.

    jalgaon shivrasta
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif