Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मोठी बातमी.. किल्ले शिवनेरीवर जाण्यास बंदी
    महाराष्ट्र

    मोठी बातमी.. किल्ले शिवनेरीवर जाण्यास बंदी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 17, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जुन्नर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिवप्रेमींसाठी दुःखद बातमी आहे.  राज्यभरातून शिवज्योती घेऊन आलेल्या शिवभक्तांसाठी प्रशासनाने विशेष निर्णय घेतला. पहिल्या पायरीवरच शिवज्योतींचे पूजन आणि प्रज्वलन करून त्यानंतर त्या विविध भागांत मार्गस्थ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    रविवारी शिवनेरी गडावर मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर दुपारपासून पुरातत्त्व विभाग आणि वन विभागाने शिवभक्तांना गडावर जाण्यासाठी पहिला दरवाजा बंद केला. पायरी मार्गावरील पायऱ्यांवर बॅरिकेड लावून प्रवेश रोखण्यात आला.

    शिवनेरीवर मोठ्या प्रमाणात होणारी शिवभक्तांची गर्दी, काही पर्यटकांचे अनिर्बंध वर्तन, कॅमेऱ्याचा फ्लॅश वापरणे, तसेच काही अज्ञानी लोकांकडून मधमाश्यांच्या पोळ्यांना दगड मारण्यासारखे उपद्रवी कृत्य केल्याने अशा घटना घडत आहेत. याशिवाय, शिवज्योतींमधून निर्माण होणारा धूर मधमाश्यांना त्रासदायक ठरत असल्याने त्यांचे हल्ले होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

    कोणती काळजी घ्यावी 

    धुरामुळे मधमाश्यांना त्रास होतो, त्यामुळे पोळ्यांच्या आसपास धूर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच, लाल किंवा भडक रंगाचे कपडे परिधान करू नयेत, मोठ्या आवाजात गोंगाट टाळावा, अत्तर, डिओड्रंट किंवा सुवासिक तेलाचा वापर करू नये. ट्रेक करताना पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी कीटकशास्त्रज्ञ प्रा. हेमंतकुमार डुंबरे यांनी केले आहे.

    काही खोडसाळ युवकांनी दगड मारून मधमाश्यांचे पोळे उध्वस्त केल्याने संतप्त मधमाश्यांनी गडावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात 47 जण जखमी झाले. सोमवारी तिथीप्रमाणे शिवजयंती असल्याने शिवनेरीवर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. शिवभक्तांनी आणलेल्या मशालींमुळे निर्माण झालेल्या धुरामुळेही मधमाश्या बिथरल्या आणि हल्ला झाला. सकाळी नऊच्या सुमारास शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली.

    घटनेनंतर गडावर एकच गोंधळ उडाला. वन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने खाली आणले. सरकारी रुग्णवाहिकांसह तीन खासगी रुग्णवाहिका गडावर दाखल झाल्या आणि जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. जाहीद हसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर उपचार केले.

    Shivneri
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif