Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शिवमहापुराण कथेतून पुन्हा चोरट्यांची दहा जणांची टोळी गजाआड
    गुन्हे वार्ता

    शिवमहापुराण कथेतून पुन्हा चोरट्यांची दहा जणांची टोळी गजाआड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 8, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे सुरु असलेल्या श्री. शिवमहापुराण कथेतून पहिल्याच दिवशी मंगपोत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता. आज पुन्हा एलसीबीच्या पथकाने १० जणांची टोळीला अटक केली आहे. ही टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ तीन दिवसांपासून . शिवमहापुराण कथा सुरु असून कथेला दररोज लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोनपोत लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने कथेच्या पहिल्याच दिवशी संशयितरित्या फिरणाऱ्या तब्बल २७महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या महिला मध्यप्रदेशातील असून त्यांची टोळीच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी २७ महिलांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, गुरुवारी पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थानव मध्यप्रदेशातील दहा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली असून या आता एकूण संशयितांची संख्या ही ३७  झाली आहे. .

    दरम्यान, गुरुवारी पुन्हा एलसीबीच्या पथकाने १० महिलांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील पाच महिला या राजस्थानमधील अलवर, भरतपुर, सदनपुरी याठिकाणारील तर पाच संशयित महिला या इंदौर येथील असून त्या देखील एकमेकांच्या नातलग असून एक संशयीत इलाहाबाद येथील असल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.

    एलसीबीच्या पथकाने पकडलेल्या टोळीमध्ये मिथीलेश बदनसिंगकुमार (वय २८), बिमलेश अनिलकुमार (वय ३५), प्रिया उर्फ ज्योती दीपक साहिल (वय ३०), ममताकुमारी सुभेदारसिंग (वय ३५), बिनाकुमारी जंदेलकुमार (वय ५०, सर्व रा. राजस्थान), किरण रमेश हरजन (वय २३, रा. ईलाहबाद, ता. उत्तरप्रदेश), विजेता राकेश जाटम (वय ३०), उषा सुरज जाटम (वय ४०), सविता बिनकुमार (वय २१), कोमल विजेंदर जाटम (वय २०), कमलेश राजेंद्र जाटम (वय ३५, सर्व रा. इंदौर, मध्यप्रदेश) या संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ९ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif