Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»शिवसेनेची रणरागिणी तेजस्वी घोसाळकर भाजपात
    महाराष्ट्र

    शिवसेनेची रणरागिणी तेजस्वी घोसाळकर भाजपात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 15, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई महापालिका निवडणुकीचं वातावरण असताना राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आता तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घडलेली ही फार मोठी घडामोड आहे.. ठाकरे गटाला रामराम करत तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात ही पक्षप्रवेश सोहळा पार पडला… अशात शिनसेनेच्या रणरागिणी असणाऱ्या तेजस्वी घोसाळकर कोण आहेत, याबद्दल जाणून जाणून घ्या… एवढंच नाही तर, भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे कुटुंबाची साथ सोडणं फार कठीण आहे.. असं देखील घोसळकर म्हणाल्या.

    तेजस्वी घोसाळकर यांचे राजकारणाशी जवळचे संबंध आहेत. तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत आणि त्यांचे पती अभिषेक घोसाळकर हे बीएमसीचे माजी नगरसेवक होते. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातील अभिषेक यांचं दुर्दैवी निधन झालं. स्थानिक रहिवासी मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने तेजस्वी यांच्या कुटुंबात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

    घोसाळकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यामध्ये फार जवळचं नातं आहे. तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या अंतिमसंस्कारसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या… दरम्यावर, तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला राजीनामा न देण्यासाठी त्यांना खूप समजावण्यात आले.

    पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे कुटुंबाने त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले, परंतु त्यांनी आपला निर्णय बदलला नाही.

    तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, ‘पक्ष आणि ठाकरे कुटुंब सोडण फार कठीण आहे. कायम त्याच पक्षाने ओळख दिली… निर्णय घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता… मी ज्या प्रकारे शिवसेनेत काम करायचे, त्यापेक्षा जास्त काम भाजपमध्ये करेल…’ असं देखील तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!

    November 9, 2026

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif