उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला ; गाडीच्या काचा फुटल्या

0

पुणे : माजी मंत्री आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला आहे. यामध्ये गाडीची करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर असताना शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटात सामील झालेले उदय सावंत हे देखील होते. हडपसर येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री हे आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घराकडे जात असताना उदय सावंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली आहे. यावेळी कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फोडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि बंड शिवसैनिकांमध्ये आक्रमकपणा पाहायला मिळत आहे. त्याचच एक भाग म्हणून आज आक्रमक शिवसैनिकांनी आमदार उदय सामंत यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे कात्रज येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची यावेळी कात्रज चौकात सभा देखील सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.