राज्यातील शिवभोजन थाळी बंद होणार ? चर्चेला उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गरजूंना आधार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) सुरु केली होती. मात्र आता बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण शिवभोजन थाळी योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) असल्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिवभोजन थाळी योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण मिळत होते. करोना काळात याची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता. मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती.

राज्यात सध्या एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते. राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.