धुळे प्रतिनिधी ;- शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान शिवारातील एका घरातून सुमारे 33 लाख 60 हजार रुपये किमतीचा सुका गांजाचा साठा शिरपूर तालुका (सांगवी) पोलिसांनी कारवाई करत जप्त केला आहे. या प्रकरणी मणिलाल इसमल पावरा याला अटक करण्यात येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यात गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छाप्याचे नियोजन करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक मिलींद पवार, अंमलदार अलताफ मिर्झा, प्रकाश भिल, मुकेश पावरा, रोहिदास पावरा, ग्यानसिंग पावरा, स्वप्नील बांगर, जयेश मोरे, सुनिल पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वन गवळी, आरीफ पठाण आणि मयुर पाटील यांनी लाकडे हनुमान शिवारातील मणिलाल इसमल पावरा याच्या शेतात कापड्याच्या गाठोड्यांमध्ये सुमारे 480 किलो गांजा आढळून आला. प्रत्येकी किलोची किंमत अंदाजे सात हजार रुपये असून एकूण किंमत 33 लाख 60 हजार रुपये एवढी आहे. साठा एकूण 24 गोण्यांमध्ये लपवण्यात आला होता.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकातं धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मिलिंद पवार, चालक अलता मिर्झा, कॉन्स्टेबल प्रकाश भील, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, कॉन्स्टेबल रोहिदास पवार, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल सुनील पवार तसेच गुन्हे शाखेचे हवालदार पवन गवळी, हवालदार आरीफ पठाण, कॉन्स्टेबल मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.