Friday, August 12, 2022

गौवंशाची अवैधरित्या वाहतूक; थाळनेर पोलिसांनी केली सुटका

- Advertisement -

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, एका वाहनात अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार आहे.  यावरून त्यांनी आपल्या टीम सोबत सांगिलेल्या ठिकाणी सापळा लावून बसले असता एका संशयित ट्रक शिरपूरकडून चोपडाकडे जातांना दिसली तिला थांबवून तपासणी केली असता त्या वाहनातून 12 गुऱ्हे आढळून आली.

- Advertisement -

- Advertisement -

या कारवाईत एकूण 3 लाख 33 हजार रु किमतीची 12 गुऱ्हे आणि 15 लाख रु. किमतीचा ट्रक असा एकूण 18 लाख 33 हजार रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

याबाबत फरहान खान, कल्लू खान मंनवर सगीर (रा. हसनपुर लुहारी जि. शामला उत्तर प्रदेश ) यांच्या विरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या